मुंढावरे ग्रामपंचायत मावळ तालुक्यातील एक सक्षम स्वतंत्र ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मध्ये मुंढावरे, वाडीवळे व वळक असे तीन वॉर्ड आहेत.
ग्रामपंचायत ही भारतातील ग्रामीण भागातील स्थानिक व्यराज्य संस्थेची (Local Self-Government) एका मूलभूत पायरी आहे. ती गावाच्या पातळीवर लोकप्रतिनिधी मार्फत चालवली जाते.
तिच्याबद्दल थोडक्यात माहिती अशी :
ग्रामपंचायतीबद्दल माहिती संघटनाः गावातील नागरिकांनी निवडलेल्या सदस्यांपासून (सदस्य व सरपंच) ग्रामपंचायत तयार होते.
कार्यकालः साधारणपणे ५ वर्षे
उद्दिष्टः गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे व विकासकामे पार पाडणे. मुख्य कार्य: स्वच्छता, पाणीपुरवठा, गटारे, वीज व्यवस्था जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी ग्रामविकास योजना व निधीचा वापर शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण उपक्रम कर वसुली (मालमत्ता कर, पाणीपट्टी) नियंत्रणः पंचायत समिती, जिल्हा परिषद व राज्य शासन अधिकार असतो.
भौगोलिक क्षेत्रफळ – ६६०.५० हे. (१६२३ acros)
लोकसंख्या – सन २०११ प्रमाणे १५५५ इतकी लोकसंख्या आहे.
ऐतिहासिक वारसा – मुंढावरे गावामधे शिवकालीन तलाव आहे. गायकवाड राजघराणे आणि टाकवे/मुंढावरे मावळ मधील गरुड देशमुख यांचे सोयरीक मावळातील गरुड देशमुखांची मुलगी बडोदा राजघराण्याची महाराणी बडोद्याचे गायकवाड घराणे आणि नाणे मावळातील गरुड देशमुख घराणे यांचा सामाजिक कार्याचा शिलालेख मुंढावरे येथील तलाव (तडाग )शिलालेख!!!!!!
उपलब्धी व स्थळ :- हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील नाणे मावळ तालुक्यातील मौजे मुंढावरे गावात असलेल्या एका चौकोनी आकाराच्या तलावावर पायऱ्या उतरताना डाव्या बाजूला कोपऱ्यावर कोरला आहे . सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून सहा आडव्या व एक उभ्या ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. शिलालेखाची शिळा गुळगुळीत असून आयताकृती आकाराची सुशोभित आहे. लेखावरील अक्षरे सुवाच्च रेखीव असून त्याचा खोलगटपणा आजही कायम आहे.मात्र जागे अभावी दोन ओळी लेखाच्या कडेला कोरल्या असून त्यावरील मजकूर मात्र खंडित असून त्यावरील अक्षरे तुटली आहेत.शिलालेख छाप घेतला असता त्यावरील अक्षरे सहजपणे वाचता येतात…
तीर्थक्षेत्र – वाडीवळे येथील संगमेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कुंडलिका आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमाजवळ असलेले भगवान शिव यांना समर्पित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर स्थानिक आकर्षण आणि पूजास्थळ आहे. हे मंदिर १० व्या ते १३ व्या शतकाच्या दरम्यान बांधले गेले असावे असे मानले जाते, बहुधा हेमाडपंती किंवा नव-यादव शैलीमध्ये. या मंदिराची रचना प्रामुख्याने डेक्कन बेसाल्ट दगड आणि विटांचा वापर करते. मंदिरात एक शिखर (घुमट) आहे ज्यामध्ये देवतांच्या असंख्य लहान, विटलेल्या शिल्पे आहेततसेच या तिर्थक्षेत्राला क दर्जा मिळाला आहे.
पर्यटन स्थळे – वेट‘न जॉय हे महाराष्ट्रातील मुंढावरे येथे स्थित एक लोकप्रिय वॉटर पार्क आणि मनोरंजन पार्क आहे, जे त्याच्या असंख्य आंतरराष्ट्रीय राइड्स, भारतातील सर्वात मोठा वेव्ह पूल आणि कुटुंबासाठी अनुकूल आकर्षणांसाठी ओळखले जाते, हे विविध मालपाणी ग्रुपचा भाग आहे.











